नगराध्यक्षाच्या खुर्चीवर तुमाने की पाटील? पंधरा फेब्रुवारीला होणार नविन नगराध्यक्षाची निवडणूक

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : येथील नगर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा संगीता सुनील शेंडे यांना पुन्हा दुसर्‍यादा नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशानुसार बुधवारी ता.२७ ला पदमुक्त करण्यात आल्याने नगराध्यक्षा निवडीचा शासकीय कार्यक्रम जाहीर झाला असून नव्या नगराध्यक्षाची निवड सोमवारी (ता. १५)ला करण्याचे आदेशानुसार ठरविण्यात आले आहे.

विशेष म्हणजे नगराध्यक्षापद हे अनुसूचित जाती (महीला) राखीव असल्याने विद्यमान नगरसेवकापैकी भाजपाच्या बबीता तुमाने आणि राष्ट्रवादीच्या सुमन पाटील या दोन नगरसेविका उमेदवारी दाखल करण्यास पात्र आहे. परिणामता नगराध्यक्षापदाची माळ तुमाने कि पाटील यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे सिंदीवासीयांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वृत असे की स्थानिक नगरपालीकेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून संगीता सुनील शेंडे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या सोबतच भाजपा ८ ; काॅग्रेस ६ ; राष्ट्रवादी २ आणि अपक्ष १ अशी पक्षीय स्थिती होती.

मतदार संघाचे आमदार तथा भाजपाचे नेते समीर कुणावार यांनी स्थानिक तडजोडीनुसार आणि लोकभावनेचा आदर करीत काॅग्रेसचे गटनेता आशिष देवतळे यांच्या गटाच्या चार नगरसेवक आणि एका अपक्षांला सत्तेत सहभागीकरित सिंदी नगरपालिकेत २०१६ ला सत्ता स्थापन केली. मात्र काही महीण्यातच नगराध्यक्षा शेंडे आणि सत्तेतील सहभागी काॅग्रेसचे आणि भाजपाच्या नगरसेवक यांच्यात तुतुमयमयला सुरवात झाली आणि नेहमी खटके उडु लागले. परिणामता पालिकेच्या कारभारात एकवाक्यता आणि सुसंगतेचा अभाव जाणवू लागला.नगराध्यक्षा एकतर्फी कारभार करतात अशी ओरड व्होवू लागली. हा वाद विकोपाला जाण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणाच्या नगराध्यक्षांचा निर्णय कारणीभुत ठरला.

यानंतर पालिकेतील १७ नगरसेवकापैकी १४ नगरसेवकानी एकसाथ नगराध्यक्षावर अविश्वास व्यक्त करीत २३ डिसेंबर २०१९ ला जिल्हाधिकारी यांच्याकडे अध्यक्षाना पदावरून पायउतार करण्याचा प्रस्ताव दाखल केला. जिल्हाधिकारी साहेबांनी दोन्ही पक्षांनाचे म्हणने ऐकून घेत आपला अहवाल मंत्रालयात पाठवीला मात्र कोविड काळामुळे निर्णय येण्यास फार उशीर लागला. तत्पूर्वी स्थानिक चंद्रशेखर बेलखोडे यांनी नगराध्यक्षानी निवडणूक दरम्यान शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे नगरपालीका अधिनियम १९६५ नुसार त्यांना पायउतार करण्यात यावे अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली. यावर सुध्दा उभयपक्षाचे म्हणने ऐकुन घेत आणि स्थानिक मुख्याधिकारी अहवालानुसार १८ जानेवारी २०२१ ला नगराध्यक्षा संगीता शेंडे यांना पदावरुन पायउतार केले.

याविरुद्ध नगराध्यक्षा शेंडे यांनी ५ जानेवारी २०२१ ला मंत्रालयातुन स्थगनादेश प्राप्त करीत ६जानेवारीला पुन्हा पदभार स्विकारला मात्र केवळ २१ दिवसातच म्हणजे २७ जानेवारी २०२१ ला नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अविश्वास प्रस्तावावर नगरपंचायत, नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम ४५ अ आणि ब अन्वये निर्णय देत नगराध्यक्षा संगीता शेंडे यांना पदमुक्त केले शिवाय पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणुक लडवु न शकण्याची बंदी सुध्दा घातली. कदाचित सिंदीच्या इतिहासातील ही एकाचअध्यक्षांना दोनदा पायउतार होण्याची पहीली घटना असावी.

पालिकेच्या या पंचवार्षिक कार्यकाळातील उर्वरित काळासाठी नगराध्यक्षाचा पदभार स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी भिमनवार साहेबानी सोमवारी ता. १ निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमनुसार नगर अध्यक्षा पदासाठी नगरसेवकांतुन नामनिर्देशन अर्ज दाखल करणे. नामनिर्देशन अर्ज मागे घेणे. १५ फेब्रुवारी ला पीठासीन अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्धा उपविभागीय अधिकारी बगळे यांच्या उपस्थितीत नवीन नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे.

विशेष म्हणजे नगराध्यक्षापद आरक्षीत असून अनुसूचित जाती महीला प्रवर्गासाठी आरक्षीत आहे. आणि पालिकेती नगरसेवकात दोनच महीला अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. यात भाजपाच्या बबीता प्रभाकर तुमाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूमन सोपान पाटील यांच्यापैकीच एकाची वर्णी लागणार आहे. पालिकेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपा कडे सर्वात अधिक ९ नगरसेवक संख्या तर काॅग्रेसकडे ६ नगरसेवक संख्या आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ दोनच नगरसेवक आहे.

शिवाय काग्रेसचा मोठा गट म्हणजे आशिष देवतळे गट चार नगरसेवक घेऊन अगोदरच भाजपा सोबत सत्तेत सहभागी असल्याने भाजपाकडे संख्या बळ मोठे आहे परिणामता नगराध्यक्षापदी भाजपाच्या बबीता प्रभाकर तुमाने यांची वर्णी लागण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. मात्र राजकारणात केव्हाही काहीही घडु शकते. राजकारणाच्या सारीपाठावर असंभव असे काहीच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here