चोरीची वाळू भरळेला टिप्पर पकडला

0
93

वर्धा : गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू भरलेला टिप्पर पकडला. हे अवजड वाहन हिंगणघाट येथीळ तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आला आहे. अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारोडा-घाटसावली मार्गावर सापळा रचून काही वाहनांची तपासणी केली. याच तपासणीदरम्यान हुसेन अली यांच्या मालकीचा टिप्पर अडवून पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात वाळू आढळून आली.जिल्ह्यातील एकाही वाळूघाटाचा लिलाव झाला नसतानाही अवैध उपसा करून वाळूची वाहतूक केली जात असल्याचे पुढे येताच अधिकाऱ्यांनी वाळू भरलेला टिप्पर ताब्यात घेतला. ही कारवाई उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. टिप्पर मालकावर काय कार्यवाही होते याकडे लक्ष लागले आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here