
वर्धा : वर्धा तालुक्यातील पवनार तसेच कारंजा तालुक्यातील सावळी(बु) येथील शेतकऱयाने आत्महत्या केली. या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांनी घेतली आहे.
पवनार येथील शेतकरी अशोक तुकाराम काकडे (वय ५५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी सेवाग्राम पोलिसांना माहिती दिली. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.अशोक काकडे यांच्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया पवनारचे दोन लाख ४० हजार ४०० रुपयांचे कर्ज आहे.
तर दुसरी घटना कारेजा तालुक्यातील सावळी(बु) येथे घडली. सावळी (बु) येथील शेतकरी रवींद्र तेजराव डोंगरे (५५) यांनी त्यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रवींद्र डोंगरे यांच्या नावाने सात एकर शेती असून, या दोन्ही शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


















































