पर्यटकांना खुणावतेय धामचे निसर्गरम्य वातावरण! परिसराला हजारो पर्यटकांची भेट; नदीकाठावर सावधगिरी बाळगण्याची गरज

वर्धा : गत आठवड्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील नद्या खळखळून वाहत आहे. पवनार येथील धाम नदी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. येथील परिसराने सध्या हिस्वागार शालू पांघरला आहे पावसामुळे या परिसरात नयनरम्य दृश्य पहायला मिळाले. डोळ्यात साठवून ठेवण्याजोगे ही नयनरम्य दृश्य प्रत्यक्ष पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. दररोज हजारोंच्या संखेने प्रर्यटक या प्रेक्षणीय स्थळालाल भेट देण्याकरिता येत आहेत.

जिल्ह्यात अनेक प्रेक्षणिय स्थळे आहेत. गत काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसाने पवनार येथील धाम नदी ओसंडून वाहत आहे. या नदीपात्रातून खडकांमधून वाहनारे पाणी काही ठिकाणी तयार झालेले छोटे-छोटे धबधबे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. शहरापासून अगदी जवळ असल्याने पर्यटक मोठ्या संखेने सहकुटूंब याठीकाणी भ्रेट देतात. शहरपासून अगदी जवळच असल्याने या परिसरात महाविद्यालयीन तरुण, शाळकरी मुळे देखील गर्दी करतात. या परिसरातील एकांतवासाच्या ठिकाणी अनेक जोडपेही पाहायला मिळतात. सोबतच परिसरात ओल्या पाट्यांनाही उधाण येत असून ठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचे खचही दिसतात. परिणामी दारूड्यांकडून परिसरात धिंगानाही घातल्या जातो. हुल्लडबाज परिसरातील वातावरण दूषित करताना दिसतात. शनिवार-रविवार पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. निसर्गाचा आनंद लुटण्याची मज्जा अनेक घतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here