

वर्धा : शेतालगत असलेल्या नदीपात्रात बुडून व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी 10 एप्रिल रोजी देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंजी परिसरात उघडकीस आली असून संजय देवराव नागपुरे (40) असे मृताचे नाव आहे.
आंजी येथील मयत संजयच्या बहिणीने शेत भाड्याने घेतले होते. वर्धा नदीपात्रात गेले असता त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह नदीत तरंगताना दिसला. माहिती मिळताच देवळी पोलिस व ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर संजय नागपुरे नदीत बुडाल्याचे समोर आले. याप्रकरणी नागपूर येथील भाऊ नरेश यांच्या फिर्यादीवरून देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.