मालवाहक वाहनासह नऊ लाख रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त! तिघांना ठोकल्या पोलिसांनी बेड्या; हिंगणघाट पोलिसांची कारवाई

हिंगणघाट : रात्रीच्या सुमारास हिंगणघाट शहरात आणण्यात येणारा देशी-विदेशी दारुसाठा हिंगणघाट पोलिसांनी पकडला. पोलिसांनी वाहनासह एकूण नऊ लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तिघांना बेड्या ठोकल्या. वर्धा मार्गावरून हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात दारुसाठा आणत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एम.एच.४० बी.एल. १८७७ क्रमांकाच्या कारला थांबतून पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणात देशी- विदेशी दारुसाठा मिळून आला.

पोलिसांनी याप्रकरणी विठठुल देवराव आडे, रोशन गोविंदा मडावी (दोन्ही रा. भटमार्ग जि.यवतमाळ) आणि विक्की शिवाजी चौधरी (रा. हिंगणघाट) यांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संपत चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटणकर, शेखर डोंगरे, नीलेश तेलरांधे, सचिन धेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, सुहास चांदोरे, सायबर सेलचे दिनेश बोथकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here