
पुलगाव : दुचाकी अपघातात धीरज तिवरे हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी वर्धा-पुलगाव मार्गविरीळ कवठा शिवारात झाला. प्राप्त माहितीनुसार, शेअर खरेदी- विक्रीचे काम करणारा धीरज तिवरे हा वर्धेला जाण्यासाठी पुलगाव बस स्थानकावर आला. पण शासकीय कर्मचारी नसल्याने त्याला बस मधून उतरवून देण्यात आले. परंतु, कार्यालयात जाणे गरजेचे असल्याने त्याने घरी परत येत दुचाकीने वर्धेच्या दिशेने प्रवास सुरू केला. भरधाव दुचाकी कवठा शिवारात आली असता दुचाकीसमोर अचानक माकड अले. अशातच वाहन अनियंत्रित होत धीरज जमिनीवर पडला. यात धीरज याला जंभीर दुखापत झाली असून त्याला सुरुवातीला पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे.






















































