नपं कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन आजपासून

पुलगाव : नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना व अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांनी दिनांक 1 मे रोजी ध्वजारोहणानंतर पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात पुलगाव येथील सर्व सफाई कामगारांसह राज्य संवर्ग अधिकारी व नगर परिषदेतील सर्व विभागांतील आवश्यक सेवेतील कर्मचारी सहभागी होत आहेत. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी सतीश शेवदे यांना देण्यात आले.

या संपाबाबतचे निवेदन देण्याकरिता अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस कामगार संघटनेचे पुलगाव अध्यक्ष संजय डाबोडेसह संवर्ग अधिकारी संघटनेचे अमर बागरे, चंद्रकांत ईश्‍वरकर, नितीन जायस्वाल, भैरवनाथ काळे, रुपेश नवलाखे, मनोज खोडे, अनिल अंबादे, अनिल चवरे, अनिल ताजने, मंदा मेश्राम, अविनाश जयदे, अंकुश मांजरे, सचिन उसरे, विकास गोयर, सुनील कन्नोजे, सुनील बोदिले, सुनील परिहार, महेंद्र समुद्र, मो. सलीम, प्रकाश नेरलवार, संजय वानखेडे व सफाई कामगार सम्राट खेराल, विक्की सनगत, संतोष जयदे यासह महिला सफाई कामगार पुष्पा मांजरे, मीरा रामा जयदे, शोभा खेराल, रेखा सारवान हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here