घरगुती शिवजयंती राज्य स्तरीय सजावट स्पर्धेत पवनारचा नागराज हेमराज हिवरे प्रथम! ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

पवनार : विर भगत सिंग विद्यार्थी परिषद व जिजाऊ ब्रिगेड द्वारा आयोजित राज्य स्तरीय स्पर्धेत बाल गटात पवनार येथील नागराज हेमराज हिवरे या बालकाने प्रथम क्रमांक पटकावून आजही शिवाजी महाराज बालकांच्या रूपात अजरा अमर असल्याचे दाखवून दिल्याने गावात त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विर भगत सिंग विद्यार्थी परिषद व जिजाऊ ब्रिगेड द्वारा शिव जयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी राज्य स्तरीय ऑनलाईन घरघुती शिवजयंती सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा दोन गटात विभागणीकरण्यात आली होती. त्यात 5 ते 16 बाल गत व 17 ते 35 अश्या दोन गटात विभागणी केली होती.

या स्पर्धेत बाल गटात पवनार येथील नागराज हेमराज हिवरे याने सुद्धा भाग घेतला होता. या स्पर्धेत आपल्याच घरी सजावट करून कुटूंबासोबत फोटो काढून पाठवणे होते. यात या बालकाने प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याच्यावर गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here