मानस युनिट तीनच्या उपाध्यक्षपदी रामदास आंबटकर, अनिल जोशी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार

वर्धा : मानस ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड च्या जामणी येथील युनिट ३ च्या उपाध्यक्षपदी विधानपरिषद सदस्य डॉ रामदास आंबटकर आणि वर्धा नागरी सहकारी बँकेचे संचालक अनिल जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार पंकज भोयर, सौ अर्चना वानखेडे यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. या नियुक्तीबद्दल सर्वांचा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, विदर्भातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करायला हवे. साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस लागवड वाढली पाहिजे, आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर शेती कशी करता येईल यासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

कार्यक्रमाला सुधीर दिवे, मानस चे संचालक सारंग गडकरो, समय बनसोड, जयकुमार वर्मा, आनंदराव राऊत, अनिल मेंढे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here