कपाशी पिकामध्ये बोंड अळीचे व्यवस्थापन! कामगंध सापळ्याचे मौजा दिग्रज येथे विद्यार्थ्यांनी दिले प्रात्यक्षिक

सिंदी (रेल्वे) : डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोल अंतर्गत श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थि आनंद घोडे याने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गाव दिग्रज येथे गुरुवारी (ता.१५) गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापनासाठी करावयाच्या उपाय यौजनाबाबत सखोल मार्गदर्शन तसेच कामगंध सापळे यांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविले .

महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभवाचे प्रमुख सहा. प्रा.दिपक बोंदरे, प्रा. पवन चिमोटे सर आणि किटकशास्त्र विषय तज्ञ सहा. प्रा.योगेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीने हे प्रतिक्षिक करून दाखविले.

जैविक पद्धतीने व्यवस्थापणासाठी कामगंध सापळ्यांचा याचा वापर करतात. बोंडअळीचा प्रादुर्भाव पिकामध्ये कमी अगोदरच नियोजन करावे लागत असुन त्यासाठी फेब्रुवारी अखेर पर्यंत शिवार कपासी मुक्त करा. अवशेष पर्हाटी नष्ट करा बाजार समित्या काॅटन मील मध्ये लगेच कामगंध व प्रकाश सापळे लावावे जमीनीची दरवर्षी खोल नांगरनी करुन उन्हाळ्यात जमीन तापु द्यावी मान्सून पावसावरच नवीन लागवड करावी. शक्य होत असल्यास कपाशी नंतर सलग दुसर्या वर्षी कपाशीचे पिक घेऊ नये. आदी बोंड अळीचे व्यवस्थापनाबाबत दिग्रज येथील शेतकरी भुपेश देवतळे, नामदेव घोडे, सागर देवतळे, मनोज तिमांडे, ज्ञानेश्वर घोडे आदींच्या शेतावर जाऊन माहीती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here