

राहुल काशीकर
वर्धा : गेल्या काही दिवसापासुन असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. चण्याच्या पिकावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मर रोग, घाटेअळी, उंटअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. वारंवार फवारणी करुनही हा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आता शेतकरी अधीकच चिंतातुर झालेला आहे.
गहु आणि चण्याच्या पिकाला थंडीचे वातावरण पोषक असते या काळात पिके चागली येतात मात्र काही दिवसातच थंडी पडल्यानंतर वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले हे वातावरण या पिकांकरीता मारक ठरत आहे. चांगले बहरलेल्या पिकाला आता किडरोगाने ग्रासल्याचे दिसत आहे. परिणामी शेतकर्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.
खरिप हंगामात सुरवातीला सोयाबीनवर खोडकीडा, चक्रीभुंगा व कपाशीवर बोंडअळी आल्याने शेतकर्यांच्या हाती आलेले पिक गेले सोयाबीन लागवडीचाही खर्च निघाला नाही तर बोंडअळीमुळे अनेक शेतकर्यांना कपाशिच्या पिकावर नांगर फिरवावा लागला तरी अंद्यापही शासनाकडून कोणतीच मदत शेतकर्यांना मिलालेली नाही.
वरातीमागुन घोडे हाकलण्याचा प्रकार…
कंबरडे मोडलेल्या शेतकर्यांना या किडरोगाचा सामना करण्याकरीता या परिस्थितीत शासनाकडून मिळनार्या अनुदानीत औषधांचा पुरवठा कणे गरजेचे होते मात्र दरवर्षीप्रमाणे वरातीमागुन घोडे हाकलण्याचा प्रकार शासनाकडून होत असल्याचे दिसुन येत आहे. किडरोगाने पिके हाताबाहेर गेल्यावर शासन अनुदानित औषधांचा पुरवठा करीत असल्याचा दरवर्षीचा शेतकर्यांचा अनुभव आहे.
शासनाकडून जाहीर केलेली मदत आलीच नाही…
बोगस बीयामुळे सोयाबीन पिकाची सुरवातीपासुनच शास्वती नव्हती झालेही तसेच सोयाबीनचे पिक हातचे गेले शासनाने याकरीता शेतकर्यांना मदतही जाहीर केली संबंधीत विभागाला आदेश देण्यात आले त्यानुसार पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकर्यांचे अर्जही मागविण्यात आले मात्र शासनाकडून अद्याप मदत मात्र आलीच नाही.
प्रतिक्रीया….
सोयाबीन आणि कपाशिचे पुर्णपणे हातचे गेले त्यामुळे लागवडीचाही खर्च निघाला नाही हजारो रुपये पाण्यात गेले तुरीवर काही प्रमाणात भिस्त होती पण तुरीही पिकल्या नाही. आता चण्याच्या पिकाचेही तेच हाल होतेकी काय याची भिती आहे शासनाने यावर आही उपाय करुन शेतकर्यांना तात्काळ मदत द्यावी अशी अपेक्षा आहे.
सुनिल निंबाळकर, तरुण शेतकरी पवनार