कृषि पर्यवेक्षक प्रशांत भोयर यांचा सपत्नीक नागरी सत्कार! महाराष्ट्रातून अशा प्रकारे पहिल्यांदा कृषि अधिकार्याचा शेतकर्यांकडून भव्य सत्कार

वर्धा : कृषि पर्यवेक्षक प्रशांत भोयर यांनी गेल्या सहा वर्षात पवनार येथील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावून त्यांना योग्य रित्या न्याय मिळून दिला. श्री. भोयर यांनी या काळात परिसरातील येथील शेतकऱ्यांशी आपली नाळ घट्ट केली. कृषि अधिकारी असतानाही शेतकर्यांची मैत्रीपुर्ण संबंध प्रस्थापित करुन त्यांच्या समस्या जाणल्या. श्री. भोयर यांचे नुकतेच प्रमोशन होऊन त्यांची कृषी पर्यवेक्षक पदी कारंजा येथे नियूक्ती झाली आहे. त्यांनी केलेले कार्याचा सन्मान म्हणुन येथील शेतकर्यांनी श्री. भोयर यांचा सपत्नीक भव्य नागरी सत्कार करुन त्यांच्या कार्याची पावती दिली.

कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालिनी आदमने, उदघाटीका जि. प. सदस्या अर्चना टोणपे तर प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सदस्य प्रोमद लाडे, उपसरपंच राहुल पाटणकर, दैनिक लोकमत जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, कृषीभूषण शेतकरी डॉ. नंदकिशोर तोटे, जिल्हा गुण नियंत्रक अधीकारी, परमेश्वर घायतिडक, ग्रामविकास अधिकारी श्री डमाळे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून संचालक, फामर पोड्यूटर कंपनीचे संचालक, दीपक शर्मा, प्रगतीशील शेतकरी, कुंदन वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

येखाद्या शासकीय अधिकार्याचा येवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य नागरी सत्कार होने ही दुर्मिळ घटना आहे. महाराष्ट्रातून कृषी विभागात पहिल्यांदा कृषी सहायकाचा असा भव्य नागरी सत्कार करण्यात येत असल्याची भावाना यावेळी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त करीत शासनाकडून सुद्धा चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात यावा, अशी आशा व्यक्त केली.

श्री भोयर यांनी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे सहसचिव, सचिव, जिल्हाध्यक्ष असेच बरेच पदाची जावाबदारी भूषवीली. तीन वर्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी सांभाळतांना त्यांच्या कामाची विशेष राहिली, या कार्यकाळात भोयर यांनी जिल्हा आणि राज्यस्तरावरील कृषी सहाय्यकाचे मुद्दे रेटून धरल्याने कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देण्यात यशस्वी ठरले, यामुळे त्यांची महाराष्ट्रात आगळीवेगळी ओळख निर्माण झाली असे मत बऱ्याच कृषी सहाय्यकांनी व्यक्त केले.

कृषी विभाग कर्मचारी, सहकारी, पतसंस्था, मागील बऱ्याच वर्षांपासून जिल्हा स्तरावरील कृषी विभाग क्रीडा महोत्सव आयोजनात आणि सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात श्री भोयर हे नेहमी सहभाग नोंदवीत होते. मात्र हे सर्व कार्य करताना त्यांना आक्रमक मुसद्दी शैलीमुळे अधिकाऱ्यांचा आणि विरोधकांच्या रोष शेवटपर्यंत सहन करावा लागला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व संचालन श्रीकांत तोटे यांनी केले, आभार कृषी सहाय्यक अंकुश लोहकरे यांनी मानले. याप्रसंगी कृषिपर्यवेक्षक, जामुवंत मडावी, मोहिन शेख, कुनाल बुलकुंडे, प्रवीण तडस, दिवाकर खेलकर, दिवाकर पेटकर, अंबादास धोपटे, चिंतामण भुजाडे, मनोहर जोगे, वैभव साखरकर, गिरीधर इंगळे, प्रकाश चोदे, सुनिल साखरकर, ग्रामपंचायत सदस्य व कृषिविभाग कर्मचारी यांच्यासह शेतकर्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सत्कार समारंभ

तालुका कृषि अधिकारी कार्यालयात कृषि पर्यवेक्षक प्रशांत भोयर यांना पदोन्नती मिळाल्या बद्दल यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला यावेळी तालुका कृषिअधिकारी विवेकानंद चव्हाण, मंडळ कृषि अधिकारी जामुवंत मडावी, कृषि अधिकारी सुभाष मुडे, कृषि सहायक अंकुश लोहकरे, श्री सर्वदे, श्री अवगन, श्री डिकळे, श्री देशमुख, श्री तेलंगे, श्री जाधव, सौ. ढुमणे, सौ. भगत, कुणाल गुलकुंडे, श्री राठोड यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here