मायबाप सरकारच डोकं ठिकाण्यावर आहे का? खत दरवाढ रद्द करा: हेमंत गडकरी

वर्धा : देशातील कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्ययंत्रणेचे तीन तेरा बारा वाजल्याने भांबवलेल्या सरकारने ऐन नविन कृषी हंगामाच्या प्रारंभी रासायनिक खतांचा किमतीत अवाजवी दरवाढ केली आहे,निदान बाजारपेठेत तसे चित्र काही व्यापाऱ्यांनी उभे केले आहे, याविषयी चित्र स्पष्ट व्हावे,जर दरवाढ झाली असेल तर दरवर्षी विचित्र संकटाने ग्रासलेल्या कास्तकाराचे पूर्णपणे कंबरडे मोडण्याचे सरकारने ठरविले आहे का?असा निर्णय घेणाऱ्या या मायबाप सरकारच डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केला आहे.

अख्या देशात कोरोनाकाळात लॉकडाऊन ची परिस्थिती असतांना केवळ बळीराजाच्या मेहनतीमुळे अन्यधान्य, भाजीपाल्याच्या पुरवठ्याच्या मुळे जिवंत राहणं शक्य झालं देशातील काही भागांमधील कास्तकार आपल्या मागण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर अनेक दिवसांपासून बसला असतांना व कोरोनाच्या भीषण संकटामुळे इतर छोटे मोठे व्यवसाय डबघाईला आले असतांना कास्तकारच विविध संकटांना तोंड देऊन उभा आहे.

अशी दरवाढ करून त्याला पण उध्वस्त करू नका याकरिता मनसेच्या वतीने केंद्रीय रासायनिक खते मंत्री सदानंद गौडा, सचिव योगेंद्र त्रिपाठी व केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिह तोमर यांना निवेदन पाठविण्यात आले असून त्याची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून कुठलीही दरवाढ शेतकरी हिताची नाही त्यामुळे या निर्णयाचा जोरदार विरोध करावा अशी विनंती करण्यात आली आहे.

सध्या चर्चेत असलेल्या या अवाजवी दुप्पट करण्यात आलेल्या दरवाढीने शेतकरी उभाच राहू शकणार नाही, सर्वात महत्वाचे म्हणजे विविध निवडणुकीच्या वेळी आम्ही शेतकरी पुत्र आहोत असे सांगून सहानुभूती मिळविण्याऱ्या खासदार, आमदार यांनी या दरवाढीचा जबरदस्त विरोध करावा असे हेमंत गडकरी यांनी म्हंटले आहे.

अगोदरच गगनाला भिडलेली महागाई, हवामानाचा व विद्युत पुरवठयाचा लपंडाव,डिझेल च्या किमतीत झालेली वाढ त्यामुळे टॅक्टर व इतर उपकरणावर झालेला परिणाम, राबराब राबून पिकविलेल्या मालाला न मिळणारा भाव आणि आता खतांची दरवाढ या परिस्थितीत शेतकरी वर्गाने जगायचे कसे हे तरी सरकारने सांगावे असेही हेमंत गडकरी यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here