

वर्धा : सेवेत कायम असलेले सेवा संरक्षण प्राप्त अनुसूचित जमातीच्या कर्मचा-यांना बेकायदेशीर अधिसंख्य पदावर वर्ग केले. ते रद्द करावे. तसेच सेवा समाप्त कर्मचा-यांना सेवेत घेऊन सेवानिवृत्तांना पेंशन मिळावी, या मागण्यांसाठी आज वर्धा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आफ्रोह संघटनेतर्फे साखळी उपोषन करण्यात आले आहे.
शासनाने ज्यांची जात प्रमाणपत्र अनुसूचित जमाती, जातप्रमाणपत्र तपासणी समितीने फसवणुकीने हजारो कर्मचा-यांना अवैध केले होते. राज्यातील अशा हजारो अनुसूचित जमातीच्या कर्मचारी व अधिकारी यांना १५ जून १९९५ च्या शासन आदेशाने सेवा संरक्षित केल्या असतांना शासन निर्णय २१ डिसें. २०२१ हा कर्मचा-यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे सेवेत असलेले सेवानिवृत्त झालेले, मयत झालेल्या अनुसूचित जमाती अधिकारी, कर्मचारी वर्गाचे जीवन जगण्याबाबत असंख्य गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहे असे आफ्रॉह चे जिल्हा उपाध्यक्ष नारायण ढोक यांनी सांगितले.