

सिंदी (रेल्वे) : शहरा लगतच्या मौजा सिंदीत येणार्या शेतातील विजेचे खांब वादळाने पडुन आठवडा लोटला तरी कुंभकर्णी झोपेत असणार्या महावितरनला काही जाग येत नसल्याने शेतकार्याचे प्रचंड नुकसान होत आहे.
सिंदी मौज्यात येणार्या विजय काॅलनी लगतच्या श्री रामस्वरुप मुदंडा या वयोवृद्ध शेतकर्याचे शेत आहे. सदर शेत सुरेश कोपरकर या अल्पभूधारक शेतकर्याने मकत्यांने केले आहे. शेतात कापुस शेतमालाची लागवड केली असुन यंदा पाऊस वेळेवर आल्यांने प्रेरणी साधली आहे. परिणामता आता शेतमालाच्या आतरमशागतीची वेळ आहे. पर्हाटीला निंदन डवरन खत फवारणी करण्याची ही वेळ आहे. मात्र आठवडाभरापूर्वी परिसरात झालेल्या वादळाने शेतातील मोटरपंपला विद्युत पुरवठा करणारे पोल तारासहीत पीकात पडले आहे.
याबाबत महावितरनच्या सिंदी अभियंता कार्यालयास तोंडी व लेखी सुचना केली मात्र दिड आठवड्यापासून कुंभकर्णी झोपेत असलेल्या महावितरन काही जाग येत नसल्याने शेतकार्याचे प्रचंड नुकसान होत आहे. सतत दरवर्षी नैसर्गिक आपत्तीने नापीकीने त्रस्त असलेल्या शेतकर्यावर आता सुलतानी संकट कोसळले असुन त्याचापण त्याला सामना करावा लागत आहे.