राहायला खोली दे म्हणत! आईला प्लॅस्टिक पाइपने मारहाण

हिंगणघाट : राहायला खोली का देत नाही, असे म्हणत मुलाने आईला प्लॅस्टिक पाइपने मारहाण करीत जखमी केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. इंदिरा गांधी वॉर्ड येथे ही घटना घडली. अरविंद खवले याला दारूचे व्यसन आहे. तो किरायाने वेगळा राहतो. मद्याच्या नशेत त्याने आई ज्योत्सना खवले यांना मी मुलगा असून, मला राहायला खोली देत नाही, किरायाने खोली देते, असे म्हटले असता ज्योत्सना यांनी अरविंदला आधी दारू सोड, असे म्हटले असता अरविंदने मारहाण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here