वाळूचोरी करताना झालेला वाद गेला विकोपाला! एकाचा मृत्यू ; तीन आरोपींना अटक

आर्वी : आर्वी तालुक्यातील टाकरखेडा येथील चार युवकांचा वर्धा नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्या एका युवकासोबत शुल्लक कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन झालेल्या हाणामारीत या युवकांच्या छाती व गुप्तांगाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरप्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यापैकी एकाने थेट आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, संकेत मारोतराव भगत (२१), रा. वरखेड ता. तिवसा जि. अमरावती, असे मृत युवकाचे नाव असून भीमराव जानराव जवंजाळ, असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे तसेच राजू देवराव मारबदे, मनोज यशवंत जवंजाळ, भास्कर मधुकर बावणे सर्व रा. टाकरखेडा असे अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. वर्धा नदीच्या पात्रातून अवैध उत्खनन करून वाळूची चोरी केली जाते. धामंत्री वाळू घाटात संकेत भगत हा वाळू चोरून आणण्यासाठी ट्रॅक्‍टर घेऊन गेला होता. दगड उडाल्याचे कारण पुढे करून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपींनी संकेतशी वाद करून त्याला बेदम मारहाण केली. यात संकेतचा मृत्यू झाला. या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध मनुष्यबळाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here