जिल्ह्यात मृत्यूने गाठले अर्धशतक! दिवसभरात ७ जणांचा मृत्यू : रुग्ण संख्या २६२९

उल्हास डायरे

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाच्या आजाराने थैमान घातले असल्याने, शहरातील खाजगी दवाखान्यांना कुलूप लागले असल्यामुळे नागरिक उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा सावंगी व सेवाग्राम रुग्णालयात धाव घेत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत संख्या झपाट्याने वाढत असून,मृत्यूच्या संख्येत वाढ होत झाली असून, मृत्यूने अर्धशतक गाठले तर रुग्णांचा आकडा २६२९ झाला असल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
कोरोना आजाराने जिल्ह्यात थैमान घातले आहेत, दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना आजाराच्या भीतीने नागरिक सेवाग्राम रुग्णालय व सावंगी रुग्णालयात उपचारासाठी जात नव्हते, आता मात्र खाजगी दवाखान्यांना कुलूप लागले असल्यामुळे नागरीक उपचार घेण्यासाठी सेवाग्राम व सावंगी मेघे रुग्णालयात जात आहे.त्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.जिल्ह्यात कोरोना आजरांमुळे ५३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने अर्धशतक गाठले तर कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा २ हजार ६२९ वर पोहचली आहे.
दिनांक १४ सप्टेंबर रोजी वर्धा येथील ६१,५६ व ६२ वर्षीय पुरुष व हिंगणघाट येथील ६० वर्षीय महिला व ६१ वर्षीय पुरुष, आर्वी येथील ६८ वर्षीय महिला व पुलगाव येथील ६७ वर्षीय पुरुषांचा मृतकांमध्ये समावेश करण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांने अर्धशतक गाठले आहे. दिनांक १२ सप्टेंबर रोजी वर्धा २६, देवळी,६ ,सेलू ६, आर्वी ५ ,आष्टी १,कारंजा १, समुद्रपूर १ व हिंगणघाट १३ रुग्ण आढळून आले आहे.जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा २ हजार ६२९ झाला तर १३११ रुग्णांणी कोरोनावर मात केली आहे. तर ५३ रुग्णांचा कोरोना आजरांमुळे मृत्यू झाला आहे.१२६४ रुग्णांवर रुग्णालयातील कोविड सेंटर मध्ये उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here