कार रस्ता दुभाजकावर आदळून बसवर धडकली! दर्शनी भागाचा चेंदामेंदा

हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्गावरुन वड़की येथे जाण्यास निघालेल्या झायलो कारचे चालकास झोपेची डुलकी आल्याने कार अनियंत्रित होऊन डिवायडरवर पलीकडे जाऊन एसटी बसवर जावून आदळल्याने घडलेल्या अपघातात झायलो कार चकनाचूर झाली. ही घटना आज १० रोजी सकाळी ११.३० वाजता दारोडा शिवारात घडली.

राळेगांव येथून हिंगणघाट जाण्यास निघालेली बसचे नुकसान झाले. खापा (नागपुर) येथून वड़की येथे जाण्यासाठी झायलो चालक राजेंद्र कांबळे हा खापा येथून निघाला सोबत कारमधे संजीवन गनावरसिंग रा.बुटीबोरी यांचेसह दोघेही प्रवासाला निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरुन दारोडा शिवारात आले असता झायलो चालक राजेंद्र कांबळे यास झोपेची डुलकी आल्याने कार अनियंत्रित होऊन डिवाइडर पार करुन रस्त्याचे दुसऱ्या बाजूस पुढे गेली.

याचवेळी राळेगांव येथून विरुद्ध दिशेने हिंगणघाट येथे जाण्यासाठी निघालेली एस टी बस क्र.एमएच ०७ सी-९०८३ सहा प्रवाशासह भरधाव वेगाने तेथून जात होती. अनपेक्षितरित्या झायलो कार मधेच आल्याने एसटी चालक इमरान खान अफसरखान याने प्रसंगावधान साधुन एसटी बस जागीच थांबविली,त्यामुळे पुढील अनर्थ टळला.परंतु एस टी बससुद्धा क्षतिग्रस्त झाली.

घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतुक सुरळीत केली,तसेच जखमी कारचालक राजेंद्र कांबळे व सहप्रवाशी संजीवन गनावरसिंग यास हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सदर प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मसराम, सोनपितळे तसेच पोलिस कर्मचारी अजय वानखेड़े, राहुल गिरडे, गणेश मेश्राम, प्रफुल चन्दनखेडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here