ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार! पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : भरधाव ट्रॅक्‍टरने दुचाकीला समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातातील दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात वरुड ते म्हसाळा रस्त्यावर झाला. राहुल रामभाऊ मडावी (३०, रा. वडगाव कला) हा एमएच ३१, डीजी २५२ क्रमांकाच्या दुचाकीने वडगाव वरुन वर्ध्यांला येण्यासाठी निघाला होता.

दरम्यान, म्हसाळा गावानजीक असलेल्या वळण रस्त्यावर समोरुन भरधाव येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्‍टरने राहुलच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात राहुल गंभीरजखमी झाला. त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नितेश मडावी याने सेवाग्राम पोलिसात तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here