सतीश खेलकर
वर्धा : जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने चिकन खानार्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बर्ड फ्लूच्या पार्शवभूमीवर चिकन खानार्यांनी आता आपला मोर्चा मटनाकडे वळविला आहे. त्यामुळे चिकणी मागणी घटलेली असून याचा मोठा फटका चिकन विक्रेत्याना बसलेला आहे तर दुसरीकडे मटन विक्रेत्यांकडे ग्राहकांची झुंबड लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात मटनाची विक्री होत असल्याचे दिसुन येत आहे.
बर्ड फ्लूच्या भितीने आता नागरीकांनी चिकन न खाल्लेलेच बरे असा पवित्रा घेतलेला आहे. परिणामी या व्यवसायावर आधारीत अनेक धंद्यांना याचा फटका बसलेला आहे. अनेकांनी चिकन आणि यापासुन बननारे अनेक पदार्थ खाण्याकडे पाठ फिरविली आहे. रात्रीच्या वेळी चायनीज खानार्यांची संख्या लक्षनीय आहे यातही चिकन पासुन बननारे अनेक पदार्थ नागरीक आवडीने खातात यात चिकन नुडल्स, चिकन लॉलिपॉप, चिकन राईस, चिकन तंदुर, चिकन बिर्यानी यासारखे पदार्थ नागरीकांना आवडीचे आहे मात्र आता नागरीकांनी हे सर्व पदार्थ खान्याचे टाळलेले आहे. परिणामी अनेकांचा व्यवसाय थंडबस्त्यात गेला आहे.
छोट्या उद्योगापेक्षा कितीतरी पटीने जास्त बर्ड फ्लूचा फटका पोल्ट्री उद्योगांना बसलेला आहे. कोट्यावधी रुपयांचे नुकसान यातुन झालेले आहे. त्यामुळे हे नुकसान भरुण काढणे पोल्ट्री उद्योगांना सहज शक्य होणारे नाही. कोरोना काळातही सुरवातला या उद्योगाला फटका बसला आता कसेतरी हे उद्योग सुरळीत चालू झाले असताना बर्ड फ्लूने पुन्हा या उद्योगांना मोठा फटका दिलेला आहे. अनेक शेतकर्यांचा पोल्ट्री हा जोड धंदा आहे यातुन बर्यापैकी उत्पन्न शेतकर्यांना मिळते मात्र ईतर पिकांप्रमाणे हा व्यवसाय देखील शेतकर्यांकरीता घाट्याचा ठरत चाललेला आहे.
मटन विक्रेत्यांची चांदी….
बर्ड फ्लूच्या भितीमुळे नागरीकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरविली मात्र नॉनवेज खाण्याचे शोकीनांनी आपला मोर्चा बोकडाच्या मटनाकडे वळविला आहे. त्यामुळे मटनाची विक्री कमालिची वाढ झालेली आहे. रविवारसारख्या दिवशी नॉनवेज खानार्यांची संख्या जास्त असते या दिवशी मटन विक्रेत्यांना ग्राहक सांभाळत नसल्याचे दिसुन येत आहे.
नॉनवेज खानार्या सर्वसामान्य नागरीकांची अडचण
कमी दरात सर्वांनान परवडेल अशा दरात चिकन मिळत असल्याने त्याची सर्वाधीक मागणी आहे. मात्र बर्ड फ्लूच्या भितीने चिकन आणि अंडी खाण्याचे बंद झाल्याने दुसरा पर्याय म्हणुन बोकडाचे मटन आहे मात्र बोकडोचे मटन ६०० रुपये किलो झाल्याने हे खाने अनेक सामान्य नागरीकांना परवडनारे नाही. परिणामी नॉनवेज खानार्या अनेक नागरीकांना नॉनवेज खान्यापासुन वंचीत राहावे लागत आहे.
बोकडाचे मटन महागण्याची शक्यता…
चिकन खाण्याचे नागरीकांनी टाळल्याने अनेकांनी आता बोकडाचे मटन खाण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे परिणामी बोकडाच्या मटन विक्रीत मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे परिसरात बोकडांना मागणी वाढल्याने शेळी पालकांनी याचा फायदा घेत बोकडाच्या किमती वाढविल्या आहे. वाढती मागणी आणि बोकडाच्या किमतीत होणारी वाढ लक्षात घेता मटनाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.