भरधाव कारचा भीषण अपघात! एक ठार तर पाच गंभीर; देवळी येथील यशोदा नदी पुलावरील घटना

देवळी : भरधाव वेगाने जानार्या कारने अनियंत्रीत होत येथील यशोदा नदी पुला समोरील रपट्याच्या भिंतीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली.

यवतमाळ येथील पोहरे कुटुंबातील सहा जण एमएच 38.1980 या क्रमांकाच्या मारुती अल्टो कारने यवतमाळवरून वर्धेकडे जात होते. तीव्र गतीमुळे देवळी येथील यशोदा पुलासमीप कार अनियंत्रित होऊन प्रथम दुभाजकावर चढली. नंतर अंदोरी कडे जाणाऱ्या रपट्याच्या भिंतीला जबरदस्त धडक दिली.

चालक राहुल रवी दिलीप पोहरे (36) हा घटनास्थळीच ठार झाले तर कार मधील दोन महिला आणि तीन लहान मुले गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमीचे नाव स्मिता पोहरे, शर्मिता पोहरे, आरती पोहरे आणि अद्विक पोहरे असल्याचे समजले. सर्व जखमींवर देवळी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून सावंगी रुग्णालयात हलविले आहे. या भीषण अपघातामुळे नागपूर -तुळजापूर या चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी खोळंबली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here