

वर्धा : मामाला शिवीगाळ करण्यास हटकले असता भाच्याच्या डोक्यावर तसेच मानेवर कुऱ्हाडीने वार करीत जीव घेण्याचा प्रयल केल्याची घटना आष्टी शहीद नजीकच्या किन्ही आबाद गावात घडली. याप्रकरणी आष्टी पोलिसात तक्रार दारवल करण्यात आली आहे.
अजेय रमेश कोवे रा. येनाळा हा दोन दिवसांपूर्वी बहिणीकडे पाहुणपणाला गेला होता, दरम्यान तो मामा सुभाष उके याच्या घराजवळ गेला असता मामा सुभाष हा विनाकारण अजय याला अश्लील शिवीगाळ करीत होता. अजयने मामा सुभाषला शिंवीगाळ करण्यास हटकले असता सुभाषने कुऱ्हाडीने अजयच्या मानेवर, डोक्यावर वार करीत त्यास गंभीर जखमी केले. याप्रकरणी आष्टी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.