१८० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! नर्सिंगच्या नावे विद्यार्थ्यांची फसवणूक; परीक्षेच्या वेळेपर्यंत प्रवेशपत्र नाही: विद्यार्थ्याचे आंदोलन

वर्धा : परीक्षेच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र मिळाले नसल्याने जिल्ह्यातील एका नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणिला लागले आहे. येथे एका नर्सिंग कॉलेजच्या रजीस्ट्रेशनवर चार अन्य कॉलेज चालवित असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षेच्या वेळेपर्यंत परीक्षा प्रवेशपत्रच न मिळाल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. १७) जिल्हा कचेरीसमोर आंदोलन सुरू केले.

शहरातील समाता नगर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये एएनएम व जीएनएम अशा दोन शाखा आहे. यांना एएनएम साठी ४० तर जोएनएमसाठी २० जागेची मर्यादा आहे. असे असताना येथे प्रवेश देण्याचे आश्वास देत विद्यार्थ्यांची कॉलेजचा ब्रँच असल्याचे महाविद्यालयाबाबत कुठलिही माहिती न देता वेगळ्याच चार कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी निवेदनातून केला आहे. प्रवेशासाठी ५० हजारांपासून तर ९० हजारांपर्यंत प्रवेशुल्क आकारण्यात आले. भरलेल्या शुल्काची पावतीची विद्यार्थ्यांनी मागणी केली असता पुर्ण शुल्क भरल्यानंतर पावती देण्यात येईल असे सांगण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.

वार्षिक परीक्षा जवळ आली असता विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र आणि इनरॉलमेंट देण्यात येते. मात्र, परोक्षेच्या तोन दिवस आधीपर्यंत प्रवेशपत्रच विद्यार्थ्यांना मिळाले नसल्याने विद्यार्थी संत झालें. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्र बघितले असता एकाच कॉलेजचे नाव दिसून आले. नाव नोंदणी नसल्याने आपलो फसवणुक झाल्याचे लक्षात येताच संतापलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. १६) रात्री पोलिस ठाणे गाठून पोलिसात तक्रार केली. य्रा प्रकरणी कॉलेजच्या एका शिक्षिकेला ताब्यात घेत पोलिसांनी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, वेळेपर्यंत प्रवेशपत्र मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

एडीट केलेले प्रवेशपत्र

संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पोलिस ठाणे गाठताच परीक्षा प्रवेशपत्र घेऊन जाण्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर रात्री ११ वाजता संदेश आला. काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यात आले. मात्र नर्सिंग काउनसलिंगने जारी केलेले प्रवेशपत्र आणि कॉलेजच्या वतीने देण्यात आलेले प्रवेशपत्र यात बराच फरक असल्याने विद्यार्थ्यांनी ते नाकारले. दिलेले ओळखपत्र एडीट केलेले असून याची चौकशी करण्याची मागणी केली.

इनरोल नसताना प्रवेशपत्र कसे

नर्सिंग कॉलेजची नर्सिंग काउंसलिग मध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे. मात्र नाव असलेल्या नर्सिंग कॉलेजची नोदणीच नसल्याने यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे इनरॉलमेंट नाही. असे असताना कॉलेजने विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र कसे देण्यात आले हा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here