शेतकऱ्यांकडून वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

वर्धा : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 220 वैयक्तिक शेततळे देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी प्रत्येकी 75 हजार रुपयाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. योजनेंतर्गत समाविष्ट विविध आकारमानाच्या शेततळ्यापैकी कोणत्याही एक शेततळ्याकरीता महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्याच्या इनलेट आऊटलेटसह आणि इनलेट आऊटलेट विरहीत या दोन बाबीकरीता अनुदान मिळणार आहे. परंतु सदर बाबीकरीता जिल्ह्यातून अत्यल्प अर्ज महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झाले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटीवर लॉगीन केल्यानंतर सिंचन साधने व सुविधा याअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडण्यात यावी. यानंतर इनलेट आणि आऊटलेटसह किंवा इनलेट आऊटलेट शिवाय यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. त्यानंतर शेततळ्याचे आकारमान आणि स्लोप निवडण्यात यावा तसेच इतर आवश्यक माहिती भरुन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. मागणी अर्ज महाडीबीट प्रणालीवर ऑनलाईन भरल्यानंतर लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांच्या निवडीची कार्यवाही प्रणालीद्वारे करण्यात येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here