शर्ट घातल्याने वाद! भावाला केले रक्तबंबाळ

वर्धा : ‘माझे शर्ट तू का घातले’ असे म्हणत वाद घाळून भावाला वीट मारून रक्तबंबाळ केले. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजतादरम्यान हिंगणघाटमधील शास्त्री वॉर्डात घडली.

विक्की गजानन धोटे रा. शास्त्रीवॉर्ड हिंगणघाट, असे आरोपी भावाचे नाव आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास शुभम गजानन धोटे हा शर्ट घालून घराबाहेर आला. तेव्हा विक्कीने त्याला माझे शर्ट का घातले’ असा प्रश्न केला. त्यावर शुभमने ‘हे तुझे शर्ट नाही’ असे उत्तर दिल्याने विक्कीने वाद घालायला सुरुवात केली. हा वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात विक्कीने वीट उचलून शुभमच्या डोक्यात हाणली. शुभमचे डोके फुटल्याने तो रक्तबंबाळ झाला. तसेच शिवीगाळ करून पुन्हा मारण्याची धमकीही दिली. शुभमने याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here