
वर्धा : मोबाईल तपासल्याच्या कारणातून मित्राने त्याच्याच मैत्रिणीला लाकडी दांड्याने डोक्यावर जबर मारहाण करीत गंभीर जखमी केले. फुले वॉर्ड परिसरात ही घटना घडली. जखमी युवतीवर हिंगणघाट येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.
माही भारत झोटींग (२२) ही तिच्या आईकडे असताना रोहीत प्रकाश गोदे हा तेथे आला. रोहीतने माहीला तु माझा मोबाईल का तपासला, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. माहीमे शिवीगाळ करण्यास हटकले असता संतापलेल्या रोहीतने लाकडी दांड्याने माहीच्या डोक्यावर जबर मारहाण केली.
दरम्यान माहीच्या डोक्यातून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत माहीला पाहून तिची वहिणी नम्रता मेश्राम ही मध्यस्थी आली नम्रताने माहीला रोहीतच्या तावडीतून मुक्त करीत त्याला हकलून लावले. गंभीर जखमी झालेल्या माहीवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. माहीच्या मृत्यूपूर्व बयाणावरून रोहीतविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या युवतीवर जीवघेणे हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असून याकडे पोलिस विभागाने गांभीर्याने बघण्याची गरज आहे.


























































