

कारंजा : तालुक्यातील नरसिंगपूर येथील वृद्ध पशुपालक जनावरे घेऊन जंगलात चारण्यासाठी गेला असता अस्वलीच्या हल्ल्यात जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवार दिनांक २ रोजी उघडकीस आली, आज दीं.३ शनिवार ला वनविभागाच्या वतीने तातडीने मृत व्यक्तीच्या गावात जाऊन त्यांच्या कुटुंबियास दहा लाखाचां धनादेश देण्यात आला असल्याचे तळेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.
गोमाजी लक्ष्मण मानकर वय ७३ रा.नरसिंगपूर असे मृतक इसमाचे नाव आहे. जनावरे चारण्यासाठी जंगलात गेला होता. यावेळी त्यांच्या अंगावर अचानक अस्वलाने हल्ला केला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. पशुपालक गोमाजी मानकर यांचे जंगलात घेऊन गेलेले जनावरे घरी परतले होते. मात्र गोमाजी मानकर घरी परतलेच नव्हते. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात आला होता. त्यांचा शोध घेतला असता त्यांचा जंगलात मृतदेह आढळून आला होता. त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला होता यात त्यांचा मृत्यु झाला.
अस्वलाच्या हल्ल्याने नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरणात
कारंजा तालुक्याला जंगल परिसर लागून असल्याने येथे वाघ,बिबट,अस्वल असे हिंसक प्राण्यांचे दर्शन भरदिवसा होत असते. त्यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अश्यातच अस्वलाच्या हल्ल्यात पशुपालक ठार झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे.जुनापाणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन दिवसापूर्वी वासरु ठार झाले.त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीला शेतात रखवालीसाठी शेतकऱ्यानी जाणे बंद केल्याचे शेतकरी सांगत आहे.