सततधार पाऊसा अगोदर काॅपरेटीव्ह बॅकेची जीर्ण भिंत पाडुन केली मोकळी! वेळीच दखल घेतल्यांने अनर्थ टळला

सिंदी रेल्वे : शहरातील आपतीजन स्थितीतील काॅपरेटीव्ह बॅकेची जीर्ण झालेली भिंत एका सेवानिवृत्त बॅक कर्मचारी आणि प्रभागाच्या नगरसेवकाच्या जागृकतेने कोणतीही दुर्घटना होण्याअगोदर पाडुन मोकळी केल्याने पुढील अनर्थ टळल्याचे समाधान लगतच्या सहा परिवारानी व्यक्त केले.

रविवारी ता. १७ ला परीसरात रात्रभर ढगफुटी सदुक्ष पाऊस पडला शहरातुन वाहणार्‍या नंदानदीला आणि आजुबाजूच्या नाल्या ढोड्यांना २०१३ समान महापुर आला. नदी खोलीकरन केल्याने काही अंशी आपत्ती टळली तरी काही नदी लगतच्याघरात पुराचे पाणी शिरलेच.. अनेक घरांची पडझड झाली. पालिकेच्या आपती विभागाने शहरातील १२ इमारती आपतीजन अवस्थे ठरविल्यापैकी मागील अनेक वर्षांपासून दिवाळखोरीत निघालेल्या वर्धा जिल्हा सहकारी बँकेची इमारतीचा मागील जुना जिर्ण झालेला भाग सुध्दा होता. हा भाग नक्कीच या सततधार पाऊसात कोसळुन लगतच्या परिवाराला धोका झाला असता. मात्र बॅक अनेक वर्षांपासून बंद पडलेली कोणी येथे काळजीवाहक सुध्दा उपलब्ध नाही परिणामता ही समस्या सांगावी तरी कोणाला असा प्रश्‍न लगतच्या परिवाराला पडला त्यांनी ही समस्या वार्डाचे नगरसेवक अमोल बोंगाडे यांचे कानावर घातली बोंगाडे यांनी या गंभीर समस्येची लागलीच दखल घेतली आणि बॅकेचे शहरातील सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर तुमाने यांना याबाबत अवगत केले त्यांनी बॅक प्रशासणाशी संपर्क साधुन त्यांना याबाबत माहिती दिली.

बॅक प्रशासणातील प्रशासकीय अधिकारी संजय कोरडे, मॅनेजर प्रविण वाघ, कर्मचारी सुनिल नागपुरे, हेमंत झाडे, प्रशांत ठाकरे आदीनी लागलीच सिंदी गाठुन रविवारी (ता. १७) लाच दिवसा ही भिंत बॅक खर्चाने जेसीबी यंत्राच्या साह्याने पाडुन पडलेले साहीत्य इतरत्र हलवित जागा मोकळी केली आणि रात्रीच मुसळधार पाऊसाला सुरवात झाली. वेळेचे भान ठेवल्याने पुढील अनर्थ टळला. वेळीच दखल घेणार्‍या नगरसेवक अमोल बोंगाडे, सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर तुमाने, आणि वर्धा जिल्हा सहकारी बँके प्रशासणाचे लगतच्या परिवारातील सुशांत खानखुरे, दिपक मुडे, नितीन फटींग, विजय फटींग, हनुमान तडस, भुषन ठाकरे, आकाश दुरबुडे आदीनी विशेष आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here