बंधाऱ्याचा केरकचरा काढुन पाण्याला केली वाट मोकळी! श्रमदानातून महापुरानंतर कोल्हापूरी बंधाऱ्याची स्वच्छता

सिंदी रेल्वे : सततधार कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे लगतच्या पळसगाव बाई येथे नंदानदीला २०१३ प्रमाणे पुर आला यामुळे या नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्याला पुरात वाहत आलेला कचरा अटकुन पाणी थोपले परिणामता पुराचे पाणी आजुबाजूच्या परिसरात आणि शेतात घुसुन मोठेनुकसान झाले. पुर ओसरताच मंगळवारी (ता. १९) गावकर्‍यांनी श्रमदान करुन बंधारा स्वच्छ केला.

श्री क्षेत्र पळसगाव बाई येथे गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे व नंदानदिला आलेल्या महापुरामुळे गावात असलेल्या कोल्हापूरी बंधारा ला वाहत आलेल्या कचरा व झाडांची खोडे अटकुन असल्यामुळे पाणी पास व्हायला अवरोध निर्माण होऊन पुराचे पाणी आजुबाजूच्या परिसरात जाण्याचा धोका निर्माण झाला होता, विषयाचे गांभीर्य लक्षात घेत सरपंच धीरज लेंडे यांनी तात्काळ पाहणी करून सदर कचरा जेसीपी यंत्राच्या साहाय्याने काढणे शक्य नसल्यामुळे गावातील नागरिकांना आव्हान करण्यात आले.

सरपंच लेंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील हनुमान क्रिडा मंडळचे खेळाडू व गावातील नागरिक यांनी श्रमदान केले व अटकलेला कचरा व खोडांचे कटर चे साहाय्याने तुकडे करून संपूर्ण कोल्हापूरी बंधाराचे सोळा ही गेट साफ करून नदीतील पाण्याचा मार्ग मोकळा करून दिला. श्रमदानातून मोठा प्रश्न गावातील नागरीकांनी श्रमदान करुन सहज सोडविला. या कार्यासाठी सरपंच धीरज लेंडे यांनी सर्व गावकऱ्यांचे आणि हनुमान क्रिडा मंडळच्या खेळाडूचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here