पवनारात वारंवार बत्ती गुलमुळे नागरीक त्रस्त! विज वितरणाचा भोंगळ कारभार

पवनार : येथील महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विजपुरवठा वारंवार खंडीत होतो. दररोज वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने येथील ग्रामस्त त्रस्त झालेे आहे. मात्र येथील विज वितरण विभाग गाढ झोपेत आहे. याबाबत नागरीकांनी विचारना केली तर येथील अभियंता त्यांना उडवाउडवीचे उत्तर देत असल्याच्या तकरारी येत आहे.

विजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नागरीकांनी याबाबत तक्रारी करुनही येथील अभियंता यावर कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने हा प्रकार चालू असल्याचे ग्रामस्त सांगतात. महावितरणाचे कर्मचारी नागरीकांशी उद्धटपणे वागतात वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देत नाही नागरीकांनी तकरारी केल्यास त्याचे निराकरण केल्या जात नाही. त्यामुळे नागरीकांमध्ये तिव्र रोष निर्माण झाला आहे.

गेल्या चार महिन्यापासून गावातील विजपुरवठा काहीही करण नसताना वारंवार खंडीत होतो. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परिक्षा चालू आहे. वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने व्यावसाईकांना याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे फार मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नागरीकांच्या या समस्येवर वरिष्ठ अधिरार्यांनी तात्काळ तोडगा काढून विजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा पवनार येथील सामाजिक संघटना या विरोधात आंदोन करनार असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here