ताई मी घर सोडून खूप दूर चाललीय! घरच्यांना सांगून देशील; मैत्रिणीच्या मोबाईलवरुन पाठविला मोठ्या बहिणीला मेसेज

वर्धा : मोठी बहीण आणि घरातील मंडळी अभ्यासावरून मुलीला टोकत असल्याने मुलीने तिच्या मैत्रिणीच्या मोबाइलवरून मोठ्या बहिणीला ‘मी घर सोडून दूर चाललीय…आईला सांगून देशील..असा मेसेज करून घरातून पलायन केले. ही बाब लक्षात येताच घरच्यांनी आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

१६ वर्षीय मुलीची परीक्षा जवळ आल्याने तिची मोठी बहीण आणि आई तिला नेहमी अभ्यास करण्यासाठी लावायचे. मात्र, अल्पवयीन मुलीला अभ्यास करण्याचा नेहमीच कंटाळा येत होता. दररोजच्या आई व बहिणीच्या बोलण्याला त्रासून तिने तिच्या मैत्रिणीच्या मोबाइलवरून मी घर सोडून चालली… माझ्या घरच्यांना सांगून देशील, असा मेसेज केला. ही बाब लक्षात येताच तिचा सर्वत्र शोध घेतला. पण, मुलगी कुठेही मिळून न आल्याने याप्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here