विनापरवाना गिट्टी उचलली! 3.90 लाखांचा दंड; महसूल विभागाची धडक कारवाई

सेलू : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी आणलेली गिट्टी विनापरवाना इतरत्र नेऊन गिट्टीचा साठा करणाऱ्या सेलू येथील नवीन नवलचंद चौधरी याला महसूल विभागाने 3 लाख 90 हजार रुपयांचा दंड महसूलच्या खनिज चोरट्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. नवीन चौधरी यांचे धानोली चौकात कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. त्याकरिता त्याने समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या अँपकॉन्स कंपनीच्या शहरालगत सुकळी स्टेशन रोडवर असलेल्या ठिय्यावरुन विनापरवाना गिट्टी आणून आपल्या कॉम्प्लेक्ससमोर गोळा केली.

मोठ्या प्रमाणात गिट्टीचा साठा दिसून आल्याने मंडळाधिकारी रमेश भोले व तलाठी बत्रा यांनी नवीन चौधरीला परवान्यांसंबंधी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. परंतु, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे किंवा परवाना नसल्याने मंडळाधिकारी व तलाठी यांनी मंगळवारी सदर गिट्टीच्या साठ्याचा पंचनामा करीत तो साठा जप्त करून अहवाल देखील तहसीलदारांना पाठविला.

तहसील कार्यालयाकडून यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आली. परंतु, तीन दिवसांच्या कालावधीत नवीन चौधरी यांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे किंवा परवाना सादर न केल्याने तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी अवैध खनिज साठवणुकीसंदर्भात आदेश दिला यामध्ये नवीन नवलचंद चौधरी यांच्या अनधिकृतपणे गोळा केलेल्या 25 ब्रास गिंट्टीच्या साठ्याकरीता जवळपास 3 लाख 90 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील खनिज चोरांत चांगलीच धडकी भरली आहे. समृद्धी महामार्गाच्या कामावरील अधिकारी साहित्य चोरून लपून बाहेरच्यांना कमी दरात विकतात, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here