वाद सोडविणाऱ्यास चाकू मारून केले जखमी! स्वावलंबीच्या मैदानावरील घटना

वर्धा : पैशाच्या कारणावरून सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला थेट चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना बुधवारी सायंकाळी स्थानिक धंतोली भागातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर घडली. अविनाश अरविंद कोसे (२३) रा. न्यू रेल्वे कॉलनी रामनगर असे जखमीचे नाव आहे.

सूर्य मावळतीला जात सर्वत्र काळोख पसरल्यावर स्थानिक धंतोली भागातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर तरुण आणि काही आंबट शौकीन आपला डेराच टाकतात. हे मैदान रामनगर पोलीस स्टेशनपासून अगदी काही मीटरच्या अंतरावर आहे. याच मैदानावर अमोल वंजारी आणि शेंदरे यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद. सुरू होता. हाच वाद सोडविण्यासाठी अविनाश कोसे हा गेला असता अमोल वंजारी याने जवळ असलेल्या चाकूने मांडीवर प्रहार करून अविनाशला जखमी केले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here