


वर्धा : रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४५७ व ३८० अन्वये दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींना रामनगर पालिसांनी नंदुरबार येथून ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत असलेल्या याच आरोपींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब पुढे आली आहे. हे दोन्ही कोविड बाधित ३० ते ५२ वयोगटातील असून सध्या त्यांना जिल्हा. सामान्य रुग्णालयातील अलग्रीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
रामनमर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील या दोन्ही आरोपींना रामनगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबार येथून ४ डिसेंबरला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींची ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपीच्या कबुली जबाबावरून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी त्यांना रामनगर पोलिसांच्या चमूने नुकतेच भोपाळ येथे नेले. तेथून परतल्यावर या आरोपींची वैद्यकीय तपासणीसह कोविड चाचणी केली असता दोन्ही आरोपींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.



















































