जनावरे चोरटे जेरबंद! तिघांना अटक: वाहन घेतले ताब्यात

अल्लीपूर : परिसरातील कोसुर्ला येथून जनावरांची चोरी झाल्याची तक्रार अल्लीपूर पोलिसांना प्राप्त झाली. तक्रारीअंती तपासाला गती देत डौलापूर येथून तिघांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून जनावरांसह वाहन जप्त केले. अविनाश सुभाष काळे (२८), गणेश मोरेश्‍वर ढेकणे (२५) व स्वप्नील मारोती कुडमते (२४) सर्व रा. डौलापूर ता. हिगणघाट असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

विलास पुंडलिक ढाले रा. कोसुर्ला यांची जनावरे चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी ७ डिसेंबरला अल्लीपूर पोलिसांत दिली. पोलिसांनी या प्रकरणी तपासचक्र फिरवून आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन बैल, एक कालवड, एक गाय, एक गोऱ्हा यासह एमएच. 3२ ए.जे. १९१५ क्रमांकाचे पिकअप वाहन असा एकूण ५ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंह पाटील व पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रमेशकुमार मिश्रा, संजय रिठे, संजय वानखेडे, निलेश नुगुरवार, अनुप नाईक व प्रशांत मोहिजे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here