कोळसा घेऊन जाणारी मालगाडी रुळावरून घसरली! डब्बे सरळ करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू

अमरावती : अमरावती नजीक बडनेरा रेल्वे स्थानकावरून नरखेडकडे कोळसा घेऊन जाणारी मालगाडी दर्याबाद शिवारात रात्री उशिरा दीड ते दोन वाजताच्या सुमारास अचानक रुळावरून घसरली. त्यामुळे मालगाडीचे काही डब्बे पलटी झाले आहेत. रात्री उशिरा हा मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

या मार्गावर रेल्वेची फार मोठ्या प्रमाणात वाहतूक नसल्या कारणाने रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही. मात्र, नरखेड भुसावळ पेसेंजर गाडी काही तास उशिरा धावण्याची शक्यता आहे. रुळावरून घसरलेल्या मालगाडीचे डब्बे सरळ करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. रेल्वे विभागाचे पथक हे काम करीत आहे. रात्री उशिरा हा मार्ग सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here