जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते पवनार येथिल आशा सेविकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

पवनार : कोरोना माहामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आशा सेविकांचा आज पवनार येथील आरोग्य उपकेंद्रात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सीओ सचिन ओम्बासे याच्या तर्फे पवनार येथील आरोग्य उपकेंद्रात डॉ अक्षय इंगळे, पिल्लारे, वाटमोडे, अर्चना घुगरे, संगीता ढोले, गीता घुगरे, सुजता जिवणे, जोती माजरे, पूनम घुगरे, संगीता झाडे, कमल मुडे, अर्चना वंजारी, संगीता मुंगले यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here