
वर्धा : भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला समोरून धडक दिली. यात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. पिपरी येथे हा अपघात झाला. भूषण इंगोले आणि त्याची पत्नी सोनाली हे दोघे एम. एच. ३२, के. ८७२३ क्रमांकाच्या दुचाकीने घरी जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या एम. एच. ३२, ए.ई. ३२९८ क्रमांकाच्या कारने धडक दिली.
यात भूषण यांना किरकोळ तर सोनाली यांच्या हाताचे हाड मोडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी रामनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.