आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास! कोटी रुपयांची फसवणूक; दोघांना अटक: खातेदारांची बँकेत तोबा गर्दी

आर्वी : बँक ऑफ इंडियाच्या बँक मित्रांनी खातेदारांची फसवणूक केल्याचे प्रकरण बाहेर येताच तक्रारकर्त्यांसह खातेदारांची बँकेत रिघ लागली आहे. फसवणुकीची रक्‍कम दोन कोटीच्या आसपास असल्याची चर्चा असून सुमारे शंभरावर खातेदार अडचणीत आले आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती आहे. सचीन राऊत आणि दिनेश तायवाडे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

सचीन राऊत आणि दिनेश तायवाडे हे दोघेही दहा वर्षांपासून बँक मित्र म्हणून काम करीत आहे. ते सतत बँकेत राहत असल्याने ते कर्मचारी असल्याचा खातेदारांचा समज झाला. फिक्स डिपॉझिट करुन देणे, खाते काढून देणे, खात्यात रक्‍कम भरणे आदी कामे ते बँकेतच राहुन करीत होते. त्यांचा बँकेत मुक्तपणे संचार होता. फिक्स डिपॉझीट करण्यासाठी, खात्यात पैसे जमा करण्यासाठी त्यांना खातेदार रक्‍कम देत गेले. हि रक्‍कम ५० हजारा पासुन तर पाच लाखा पर्यंतची होती. खातेदारांना या पोटी ते स्वत:च्या सही निशी कौऊटर स्लिप सुध्दा देत होते. बँकेवरील विश्वास आणि ईपारती मध्येच होत असलेला व्यावहार यामुळे खातेदारांना विश्वास बसला. पाहता पाहता शंभराच्यावर खातेदार त्यांच्या जाळ्यात अडकत गेले तर सुमारे दोन कोटीच्यावर आकडा पोहचला.

असे फुटले बिंग खातेदारांनी बँकेत जमा करण्यासाठी, डिपॉझीट करण्यासाठी दिलेली रक्‍कम सचीन राऊत व दिनेश तायवाडे हे स्वत: जवळ ठेवत होते. याची माहिती खातेदारांना मिळाली की ते त्यांची दिशाभूल करुन दुसरा सावज पाहत होते. त्याचे आलेले पैसे पहिल्याला देत होते. अशा टोप्या फिरवत फिरव पाच वर्षे कसे तरी निघाले. मात्र आकडा व प़रागणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणी अखेर बिंग फुटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here