सेलू : चाणकी (कोपरा) येथे रासायनिक खतांच्या बॅग घेऊन जाणारा ट्रक पलटला, ही घटना सेलू तालुक्यातील चाणकी कोपरा येथील जुनोना मार्गावर शनिवार 11 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रासायनिक खतांच्या बॅगा घेऊन वर्धेला जाणारा ट्रक क्र. एम.एच. 40 एन. 5140 हा रस्त्यावरील उघड्या पडलेल्या गोट्यांमुळे असंतुलित होऊन पलटी झाला. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथून सदर ट्रक रासायनिक खतांच्या बॅगा घेऊन जुनोना येथे आला होता. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात ट्ररकचे मोठे नुकसान झाले. गत तीन वर्षांपासून रोडचे काम राजेश्वरी कन्स्ट्रक्शन कंपनी करीत असून, संथगतीने व निकृष्ठ दर्जाचे काम होत आहे. त्यामुळेच अपघात होत असून, हा तेथील तिसरा अपघात असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तेथील कृषी केंद्रात काही बॅग खाली करून उर्वरित 200 बॅगा घेऊन ट्रक वर्धेकडे जात होता. दरम्यान, चाणकी कोपरजवळ हा अपघात झाला.