पत्रकार रविन्द्र कोटंबकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा! महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची प्रशासनाला निवेदनातून मागणी

वर्धा : सोमवारी रात्री दैनिक सहासिक वृतपत्राचे मुख्य संपादक रविन्द्र कोटंबकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे नेमका सूत्रधार कोण याचा शोध घेत अज्ञात हल्लेखोरांना हुडकून काढावे व कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आज 19 एप्रिल रोजी वर्ध्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सोमवारी वर्धा-नागपुर मार्गावर पत्रकार रविन्द्र कोटांबकर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्याच्या मागे नेमके कोण आहे याचा शोध पोलीस प्रशासन घेत आहेत. पोलिस यंत्रणा शोध घेऊन कारवाई करेल असे आश्वासन अप्पर पोलिस अधीक्षक सोळंकी यांनी दिले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाणबुडे, उपाध्यक्ष अनिल गावंडे, सचिव एकनाथ चौधरी, श्याम उपाध्याय, मनीष शर्मा, मिलिंद आंडे, सुरेंद्र रामटेके, निलेश पिंजरकर, राहुल काशीकर, राहुल खोब्रागडे यांच्यासह पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष रविराज घुमे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here