दुचाकी टिप्परमध्ये घुसली! दोन युवक जागीच ठार; पुलगाव नजीकची घटना

पुलगाव : भरधाव वेगाने येत टिप्परला भिषण धडक दिली यात दोन यूवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. पुलगाव नजिकच्या हिवरा येथे ही घटना घडली. या धडकेत सुरज किशोर ढोले (वय २५) व सचिन उमेश कनेरी (२८) दोघेही राहणार रसुलाबाद जागीच ठार झाले.

हिवरा गावाजवळ उभ्या असलेल्या टिप्पर (एम.एच.३२ क्यू ७००७) पुलगाव येथुन रसुलाबाद कडे जाणाऱ्या मोटार सायकल स्वारांनी धडक दिली. धडक इतकी भिषण होती की मोटार सायकल स्वार टिप्परमध्ये घुसले यात दोघांचाही मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here