बसस्थानकावर मुलींची छेड काढणाऱ्यास चोपले! आर्वी येथील बसस्थानकावरील प्रकार

वर्धा : मद्यधुंद अवस्थेत मुलींची छेड काढत असलेल्या ब्राह्मणवाडा येथील श्याम उईके ( वय ३० ) याला परिसरातील नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना आर्वी येथील बसस्थानकावर शनिवारी घडली. बसस्थानकाच्या आवारात असलेल्या मुलींची एक युवक छेड काढत असल्याचे लक्षात येताच काहींनी त्याला हटकले असता या युवकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेऊन चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. अधिक विचारपूस करता या तरुणाने आपले नाव श्याम उईके, रा. ब्राह्मणवाडा असे पोलिसांना सांगितले. श्याम हा मद्यधुंद अवस्थेत होता, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास जमादार रंजित जाधव , सतीश नंदागवळी , अनिल वैद्य करीत आहेत. आर्वी येथील बस स्थानकावर नेहमीच काही तरुण मुलींची छेड काढत असल्याने या ठिकाणी नियमित पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here