हत्या करून मृतदेह फेकला रस्त्यावर! हेटीकुंटी फाट्याजवळील घटना

कारंजा : एका अनोळखी वृद्धाची हत्या करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. ही घटना बुधवार 30 मार्च रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील हेटीकुंडी फाट्याजवळ उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकाची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती मिळाली आहे. मृतकाचे वय अंदाजे 60 वर्ष असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी दुपारच्या सुमारास रस्त्याने जात असलेल्या नागिरकांना रोडच्या कडेला मृतदेह असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी कारंजा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक बबन मोहंदूळे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकासह फॉरेन्सिकच्या टीमलाही पाचारण करण्यात आले. सदर प्रतदेहाची पोलिसाकडून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बबन मोहंदूळे, पोलिस कर्मचारी किशोर कडू, गुड्डू थुल, किशोर कापडे, दीपक सनिवने, तुषार चाफले आदी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here