प्रहारची तहसीलवर धडक

वर्धा : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ प्रहारच्या वतीने पायदळ दुचाकी मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात सहभागी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत नेत तालुका कचेरीवर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत & राष्ट्रपतींसह पंतप्रधानांना पाठविण्यात आले. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या पेट्रोल प्रतिलीटर १०० रुपयांच्या घरात असून, दिवसेंदिवस वाढत असलेल्या दरामुळे नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावरही पडत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने या प्रकरणी लक्ष देत तातडीने योग्य निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनात प्रहारचे तालुकाध्यक्ष चंदन महिळे, अक्षय भोने, प्रीतम कातकिडे, समीर शेख, उमेश खापरे, हरिभाऊ हिंगवे, शंतनू सोनारे, अंकुश पारीसे, मुक्तार शेख, हर्षल चोपडे, रोहित घागरे, प्रतीक वाहने, गौरव मनोहर यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here