
वर्धा : भरधाव कार आणि मालवाहूची घडक झाली. हा अपघात नागपूर-अमरावती मार्गावरील राजणी शिवारात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या झाला. यात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला असून मालवाहू चालक पुरुषोत्तम खवशी यांचा जागीच पृत्यू झाला. तर अपोल पाठे हा जखमी झाला. तसेच डॉ. सोनोणे, त्यांची पत्नी व दोन वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला. अपघाताची वार्ता परिसरात वार्यासारस्वी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

















































