निलगाईला वचविण्याच्या प्रयत्नात दारू भरलेला भरधाव ट्रक उलटला! समृद्धी महामार्गावरील अपघात

वर्धा : बिअरचे बॉक्स घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकसमोर अचानक निलगाय आडवी आल्याने निलगाईला वाचविण्याच्या धडपडीत चालकाने स्टेअरिंगवरून नियंत्रण सुटले अन्‌ ट्रक चक्क रस्त्याकडेला उलटला, हा अपघात १मे रोजी पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास महाकाळ शिवारातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर झाला.

नागपूर येथील वाडी परिसरातून निशा ट्रान्सपोर्ट कंपनीचा एम, एच. ४० पी. एम. २६१५ क्रमांकाचा ट्रक औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीतून बिअरचे बॉक्स घेऊन नागपूरकडे जात होता. तालुक्यातील महाकाळ शिवारातून गेलेल्या समृद्धी महामार्गाने ट्रक जात असताना ट्रकसमोर अचानक निलगाय आडवी आली. दरम्यान उत्तरप्रदेश लखीमपूर येथील ट्रकचालकाने निलगाईला वाचविण्यासाठी ब्रेक मारला. मात्र, ट्रक अनियंत्रीत होऊन रस्त्याकडेला खोलगट भागात उलटला. या घटनेत जवळपास ९ ते १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज ट्रकचालकाने वर्तविला. सुदैवाने कुणालाही गंभीर मार लागला नाही. या अपघाताची माहिती सेलू पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळ गाठून पंचनामा करीत नोंद घेतली. तसेच वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here