गौळ येथे लोंटागण महाराज चातुर्मास समाप्ती साधेपणाने संपन्न! कोरोनामुळे संस्थेकडून दक्षता

देवळी : गौळ येथील संत लोटांगण महाराज चातुर्मास समाप्ती महोत्सव यात्रेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते पंरतु या वर्षी कोरोणाच्या महामारीमुळे अगदी साधेपणाने चातुर्मास सोहळा करण्यात आला.

या वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमा सोबतच महाप्रसादाचा कार्यकम रद्द करण्यात आला होता.
या देवस्थानांत 1939 पासून स्वतः लोंटागण महाराजांनी सुरू केलेला चातुर्मास आजही येथे पाळल्या जाते.

संत लोंटागण महाराज पंढरपूर पर्यन्त लोंटागण घालीत विस वर्ष वारी पूर्ण केली. त्या काळी भेदभाव असतांनाही महाराजांनी मानुस आमची जात ही शिकवण दिली. हीच शिकवण आजही येथे अनुभवास मिळते. सर्व गावातील सर्वच समाजातील आजही लोक या संत लोटागण महाराज यांच्या पुढे नतमस्तक होवून मानुस आमची जात हे दाखवून देतात.

येथे जेव्हां चातुर्मास पाळल्या जाते या कार्यकाळात येथे उत्साहाचे वातावरण असते.
या बाबत देवस्थानचे अध्यक्ष रामदास पवार यांनी सांगीतले की गावातील सर्वच समाजातील लोकांचा या कार्यक्रमला सहभाग मिळतो. या कोरोणा काळात सर्व गावातील लोकांनी सुरक्षेच्या दृष्टीने शासनाला सहकार्य केले.

या उत्साहात अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडतात पंरतु या वर्षी भक्तांचा हिरमोड झाला असून कोरोणामुळे सुरक्षित जीवन राहण्यासाठी मास्क व सॅनीटायझर वापरण्याचे कार्यक्रमात सांगण्यात आले.

या कार्यक्रमात नामदेव वसु महाराज यांचे काल्याचे कीर्तनानंतर संत लोंटागण महाराज उत्सवाची सांगता करण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष नरेश घोंगे यांनी सर्व भाविकांना आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here